शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने संपवली जिवनयात्रा

On: May 8, 2021 10:14 AM

नाशिक : नाशीक शहरातील पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत उमेश नाईक या शिवसेना माजी पदाधिका-याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

नाशिकच्या काळाराम परिसरातील रहिवासी असलेले उमेश नाईक यांचे नागचौक परिसरात जुने घर आहे. आपण जुन्या घरी जात असल्याचे नाईक यांनी आपल्या पत्नीला सांगत शुक्रवारी प्रस्थान केले होते. नागचौक येथील जुन्या घरात त्यांनी घराच्या स्लॅबला दोरीच्या मदतीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेह ताब्यात घेतला. आर्थिक विवंचनेतून नाईक यांनी आत्महत्या केल्याचा एक प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment