आत्महत्येपुर्वीच पोलिसांनी पकडले खूनातील संशयीताला

On: July 8, 2020 6:49 PM

पिंपरी चिंचवड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करुन फरार आरोपी पतीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील संशयीत आरोपी स्वतःच आत्महत्येच्या तयारीत होता. तत्पुर्वीच त्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

करीम शेख असे संशयीताचे नाव आहे. त्याने  दोन दिवसांपूर्वी पत्नी आबेदा शेख हिचा साई नगर देहू रोड येथे तिचा धारदार हत्याराने खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. करीमचा शोध सुरू असतांना मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने त्याला अटक केली.

पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना संशयीत आरोपी रांजणगाव येथे दुचाकीवरुन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

सापळा रचून करीम यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्याच्याकडून नायलॉन दोरी, एक सुसाईड नोट हस्तगत करण्यात आली. पत्नीच्या अनैतिक संबंधातून तिचा खून केल्याचे व त्यानंतर आपण आत्महत्या करणार असल्याचे सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले होते. आत्महत्या करण्यापुर्वीच पोलिसांनी करीमच्या मुसक्या आवळल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment