मेष : व्यवसायात मान सन्मान व प्रतिष्ठा मिळेल. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट घडेल.
वृषभ : आपले संवाद कौशल्य उपयोगी पडेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील.
मिथुन : कौटूंबिक वातावरण उत्साही व आंनंदी राहील. एखादी चांगली बातमी कानावर येईल.
कर्क : आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा कुणी घेत असेल तर सावध व्हा. सतर्क राहुन निर्णय घ्या.
सिंह : अचानक धनलाभ होण्याची शक्यता. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
कन्या : नोकरी व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध होईल. मुलांचे यश बघून मन समाधानी होईल.
तुळ : कुणाच्या वादविवादात पडू नये. आर्थिक स्थिती ठिकठाक राहील.
वृश्चिक : नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता. निराशा टाळून सकारात्मक राहून काम करावे.
धनु : मध्यम फलदायी दिवस राहील. प्रवासात सावधगिरी बाळगावी.
मकर : मित्रांची भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रलंबीत व्यवहार मार्गी लागतील.
कुंभ : आरोग्याच्या बाबतीत पथ्यपाणी पाळावे. कुणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.
मीन : क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. विरोधकांकडून कामाचे कौतुक होईल.