जळगाव : समाजामधे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधक कारवाईची आवश्यकता असते. दंगलीत स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान होत असते. या नुकसानीची भरपाई संबंधीत आरोपींकडून वसुल केली तर जातीय, धार्मिक दंगलीत सहभागी होण्याचे प्रमाण कमी होईल.
ज्या क्षेत्रात नेहमी जातीय व धार्मिक दंगली घडून येतात त्या भागातील लोकांकडून भरपाई करण्याच्या हेतूने महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 51 नुसार संबंधित क्षेत्र अशांतता क्षेत्र घोषीत करणे गरजेचे आहे.
रावेर शहरात 22 मार्च 2020 रोजी जातीय दंगा झाला आहे. यापुर्वी देखील या शहराला दंग्याची पार्श्वभुमी आहे. ती पार्श्वभुमी लक्षात घेता या शहरात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 51 नुसार हे क्षेत्र अशांतता क्षेत्र घोषित करणे गरजेचे आहे.
म.पो.अधिनियम सन 1951 चे कलम 51(3) नुसार ठरवलेली नुकसानीची रक्कम रावेर नपाने शहरातील नागरिकांकडून वसुल करण्याबाबत फर्मावण्यात यावे असा अहवाल जिल्हाधिका-यांना पोलिस अधिक्षकांकडून सादर करण्यात आला आहे.