धारावीत अल्पवयीन तरुणाची चाकूने हत्या

On: July 8, 2020 9:17 PM

मुंबई : धारावीत दिवसाढवळया १७ वर्षाच्या तरुणाची हत्या झाल्याने बुधवारी खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी धारावी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास धारावीतील हनुमान चौकात ही घटना घडली. येथील सुभाष नगर परिसरातील कौशिक सुनील नारायण या तरुणाची हत्या झाली आहे. दुपारच्या सुमारास अनोळखी आरोपीनी चाक़ूने त्याच्यावर वार करत त्याला गंभीर जखमी केले.

नागरीकांच्या मदतीने त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल असून तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment