चोरीच्या मोटार सायकलीसह दोघे अटकेत

On: May 11, 2021 7:22 PM

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने चोरीच्या चार मोटारसायकलीसह दोघा चोरट्यांना अटक केली आहे. गोपाल राजेंद्र पाटील व विशाल मधुकर इखे ( दोघे रा. चिंचोली ता. जळगाव) अशी अटकेतील दोघा चोरट्यांची नावे आहेत. पोलिस स्टेशन अभिलेख्यावरील मेहरुण परिसरातील रहिवासी व अट्टल गुन्हेगार मुकुंदा देवीदास सुरवाडे हा मोटारसायकली चोरुन चिंचोली गावातील गोपाल पाटील व विशाल इखे यांच्यामार्फत स्थानिक लोकांना कमी किमतीत विकल्या असल्याची माहिती पोलिस नाईक गणेश शिरसाळे यांना समजली होती.

या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, हे.कॉ. गफ्फार तडवी, पो.ना. मिलींद सोनवणे, गणेश शिरसाळे, पो.कॉ. योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत कळसकर, सिद्धेश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, शांताराम पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेत दोघा चोरट्यांना सापळा रचून चोरीच्या दुचाकीसह अटक केली आहे. यातील अट्टल गुन्हेगार मुकुंदा देवीदास सुरवाडे हा फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment