नाशिक : नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक (मालेगाव) संदिप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे पथकाने मालेगाव शहरातील तिघा सराईत चोरांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून चोरीच्या सात मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत.
महम्मद रमजान महम्मद इब्राहिम उर्फ रमजान काल्या (२१) रा निहालनगर, सुन्नीपुरा, मालेगाव. नाविद अहमद शकील अहमद उर्फ नाविद टकाऱ्या( २१) रा दत्तनगर, हमीद चौक, मालेगाव. वसीम अहमद मोहमद फारुख (२८) रा दत्तनगर, मालेगाव.
आरोपी रमजान काल्या व नाविद टकाऱ्या हे दोघे चोरीच्या मोटर सायकल विक्रीसाठी वसीम अहमदकडे घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती स्थागुशाचे पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने मुंबई आग्रा हायवेवर सवंदगाव फाटा परिसरात आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून १ स्प्लेंडर प्लस, १ यामाहा एफ झेड, २ सुझुकी जिक्सर, १ हिरो एच एफ डीलक्स, १ होंडा शाईन, १ स्प्लेंडर प्रो अशा एकूण ७ चोरीच्या मोटर सायकल व २ सॅमसंग, १ रिअलमी, १ ओप्पो असे ४ मोबाईल फोन असा २ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे वडनेर खाकुर्डी, पवारवाडी व धुळे शहरातील पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.या गुन्हयातील आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.
त्यांच्यावर यापूर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यासह धुळे जिल्ह्यात मोटर सायकल चोरी, जबरी लूटमार, आर्म अक्ट, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.तिघा आरोपींना वडनेर खाकुर्डी पो. स्टे.मधील गुन्हा नंबर १२५/२०१९ भादवि ३७९ ह्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
त्यांचेकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के.पाटील यांच्या पथकातील पोहवा सुहास छत्रे, वसंत महाले, पोना राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, पोकॉ फिरोज पठाण, रतीलाल वाघ, दत्ता माळी यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.