नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार लक्षात घेता देशाच्या विविध भागात लॉकडाऊन सुरु आहे. अशातच कोरोनामुळे अनेक परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. आता राष्ट्रीय लोकसेवा आयोगाकडून 27 जून रोजी घेतली जाणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेली परीक्षा आता 10 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार असल्याचे यूपीएससीकडून सांगण्यात आले आहे. तरीदेखील ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव राहीला तर त्यावेळी देखील परीक्षा लांबणीवर पडू शकते. युपीएससी कडून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय विदेश सेवांमध्ये अधिकारी निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेतली जाते. गृप ए आणि गृप बी अशी एकूण 712 पदे नागरी सेवा अंतर्गत परीक्षा घेऊन भरण्यात येणार होती. त्यासाठी 27 जून 2021 रोजी प्राथमिक परीक्षा घेण्यात येणार होती. 4 मार्च 2021 रोजी सदर परीक्षेसाठी फॉर्म जारी करण्यात आले होते. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या ज्या उमेदवारांना निवडलं जाते त्यांनाच मुख्य परीक्षेला बसता येते.