पोलीस अधिक्षकांसह पोलिसांची हत्या घडवणाऱ्या विकास दुबेला अटक

On: July 9, 2020 11:36 AM

लखनऊ : कानपूर शूटआऊट प्रकरणातील प्रमुख आरोपी विकास दुबेला आज अटक करण्यात आली. तत्पूर्वी विकासच्या तीन साथीदारांचे पोलिसांनी एन्काऊंटर केले आहे. विकास दुबेचा कसून शोध सुरू होता.

अटकेतील विकास दुबेला उज्जैनमधील फ्रीगंज पोलीस स्टेशनला आणले. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे.अटकेनंतर युपी पोलिसांची एसटीएफ टीम उज्जैनला दाखल झाली आहे. विकास फरिदाबादमध्ये पोलिसांना दिसला होता.

तिथून तो उज्जैनला कसा गेला, याबाबत चौकशी सुरू आहे. त्याला राज्याबाहेर जाण्यास कुणी मदत केली याचा तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment