जळगाव : मुंबई – हावडा मेलने प्रवास करणा-या तरुणाचा पाचोरा ते जळगाव दरम्यान धावत्या रेल्वेत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
अबजुर शेख जियाउल हक (23) रा. रहिमपूर, माणिकचक इनायतपुर जिल्हा मालदा पश्चिम बंगाल असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ईद निमीत्त तो आपल्या गावी जात होता. रेल्वे खांब क्रमांक 400/13-15 जवळ घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर झाले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अविवाहीत अबजुर हा घनसोली येथे बांधकामावर कामगार होता. त्याच्या पश्चात आई, तिन भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे.