जळगाव : जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील एका शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता व त्यांच्या पथकाने आज धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईत सुमारे 7 ते 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. याशिवाय या कारवाईत 10 ते 12 जणांना देखील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. भगवान नामदेव पाटील उर्फ पिंटू या सरपंच पतीच्या शेतात हा जुगार अड्डा सुरु होता असे समजते व त्यास देखील ताब्यात घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या मोठ्या कारवाईने जळगाव तालुक्यातील जुगार खेळणा-यांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.