दोघे मोटार सायकल चोरटे अटकेत

On: May 15, 2021 5:59 PM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा मोटार सायकल चोरांना त्यांनी चोरलेल्या तिन मोटार सायकलसह ताब्यात घेत अटक केली आहे. देवानंद लिलाधर भालेराव (22) व समाधान राजु सोनवणे (22) दोन्ही रा. धनजी नगर आसोदा – जळगाव अशी अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत. जिल्हापेठ व नशिराबाद पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याची दोघांनी कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील तिन मोटारसायकली त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोघांना पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या तपासकामी हे.कॉ. प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, पो.ना. विजय पाटील,पो.कॉ. पंकज शिंदे यांनी तपासात सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment