अक्षय नेहमी बघायचा चित्रफित अश्लिल! —— पत्नीचे जगणे केले त्याने बरेच मुश्किल !!

जळगाव : पुर्वीच्या काळी सिनेमा हेच एकमेव करमणूकीचे साधन होते. त्याकाळात जोडप्याला सिनेमा बघण्यासाठी जाण्यापुर्वी चार वेळा विचार आणि नियोजन करावे लागत होते. घरातील जेष्ठांचा आदर सन्मान करुन रितसर परवानगी घेऊनच घराबाहेर जाता येत होते. घरापासून काही अंतर पुढे गेल्यावरच जोडपे सायकलवर डबलसिट बसून जात होते. परत आल्यावर देखील गावाच्या बाहेरच लांब अंतरापासून जोडपे विभक्त पद्धतीने घरी परत येत होते. त्या काळात तरुण जोडप्यांना मोठ्या प्रमाणात सामाजीक व कौटुंबिक बंधने होती. त्या काळातील सिनेमात अश्लिलता जवळपास नव्हती. कामुक दृश्य सांकेतीक पद्धतीने दाखवली जात होती. त्यामुळे त्या काळात लैंगीक अत्याचाराचे प्रमाण देखील कमी होते असे म्हणता येईल.

मात्र आता काळ बदलला आहे. काळानुसार सिनेमातील कामुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तर मोबाईलवर कामुक दृश्ये बघण्यास फार वेळ लागत नाही. अश्लिल सिनेमांचे मोठ्या प्रमाणात पेव आल्यामुळे आजकालची तरुण पिढी देखील तसलाच अश्लिल प्रकार करण्यासाठी उत्साही असल्याचे दिसून येते. विदेशी व्यावसायीक कलाकारांनी अश्लिल चित्रफितीच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे साधन निर्माण केले आहे. त्यामुळे आजकालची तरुण पिढी बिघडण्याचे व तसलेच प्रकार करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

नव्याने लग्न झालेला तरुण वर्ग मोबाईलवर पाहण्यात आलेल्या अश्लिल चित्रफितीप्रमाणे कामक्रिडा करण्यासाठी प्रयत्नशील आणि आग्रही असतात. मात्र अश्लिल चित्रफितीत (पोर्न फिल्म) दाखवण्यात येत असलेले कृत्य अमानवीय असतात. व्यावसायीक आणि सरावलेल्या नर – नारी कलाकारांनी एखाद्या पशूप्रमाणे ते चित्रफित निर्मीतीत आपली कामुक अदाकारी आणि कलाकारी दाखवत असतात. मात्र आपणही तसाच प्रकार आपल्या नवविवाहीत पत्नीसोबत करण्यासाठी आजकालच्या पिढीचे काही काही अती उत्साही तरुण आग्रही दिसून येतात. त्यामुळे पती पत्नीत निर्माण झालेला वाद थेट पोलिस स्टेशनपर्यंत गेल्याचे किस्से विविध घटनांमधून दिसून येतात. कायद्याच्या भाषेत कलम 377 नुसार म्हटल्या जाणा-या या प्रसंगामुळे व प्रकारामुळे नारीच्या जिवाला मोठ्या प्रमाणात यातना होत असतात. या यातना असह्य झाल्या म्हणजे ती नारी नाईलाजाने पोलिस स्टेशनला जाऊन सक्षम महिला पोलिस अधिका-यासमक्ष आपली कैफीयत मांडते. जळगाव शहर पोलिस स्टेशनला एका नवविवाहीतेने तिच्या पतीविरुद्ध अशाच स्वरुपाची एक तक्रार दाखल  केली आहे. तिच्या फिर्यादीनुसार रितसर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.

 जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत कंगना (काल्पनिक नाव) आपल्या आई वडीलांसह राहते. कंगना विवाहयोग्य झाल्यामुळे तिच्या विवाहासाठी तिच्या आईवडीलांचे प्रयत्न सुरु होते. जळगाव शहरातील अक्षय (काल्पनिक नाव) या तरुणाचे स्थळ तिच्या आईवडिलांना  योग्य वाटले. त्यामुळे निवडक नातेवाईकांच्या मदतीने दोन्ही पक्षाकडून कंगनाच्या विवाहाची बोलणी करण्यात आली. बोलणी यशस्वी झाल्यानंतर लवकरच तिचा विवाह जळगाव शहरातील अक्षयसोबत करण्याचे निश्चित झाले. 19 फेब्रुवारी रोजी कंगनाचा विवाह अक्षयसोबत तिच्या माहेरी उत्साहात झाला.

23 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी नवविवाहीत कंगना व अक्षय या दोघांना प्रथमच शयनकक्षात प्रणयाची संधी मिळाली. पोर्न फिल्ममधे  दाखवतात त्याप्रमाणे प्रणय नव्हे तर धसमुसळेपणा करण्याची अक्षय यास घाई झाली होती. पत्नी कंगनासोबतचा शयनकक्षातील अगतिक क्षण मोबाईलमधे शुट करण्यासाठी देखील त्याने तयारी केली. त्या पद्धतीने त्याने त्याचा मोबाईल कॅमेरा सेट केला. त्याने पत्नी कंगनासोबत अमानवी पद्धतीने मिलनाचे कृत्य करण्याची इच्छा व्यक्त केली व  तसे कृत्य करण्यास बळजबरीने सुरुवात देखील केली. या गैरप्रकाराचा त्रास होऊ लागल्यामुळे कंगनाने तसे कृत्य करण्यास अक्षयला नकार दिला. तिचा नकार मिळताच त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी तुझ्यासोबत केलेल्या या प्रसंगाची व्हिडीओ शुटींग केली आहे. तु जर मला माझ्या मनाप्रमाणे तशा प्रकारचे कृत्य करु दिले नाही तर मी या क्लिपचे प्रदर्शन माझ्या मित्रांकडे करेन व तुझी बदनामी करेन अशी त्याने तिला धमकी दिली.

मोबाईलमधे शुट केलेला प्रसंग मित्रांना दाखवण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्यासोबत पोर्न फिल्ममधे दाखवतात त्याप्रमाणे कर्म केले व तिला देखील स्वत:च्या मनाप्रमाणे तसे कृत्य करण्यास भाग पाडले. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण करत तिच्यासोबत बळजबरी केली. त्यानंतर हा प्रकार नेहमीच होऊ लागला. रोज रात्री या प्रसंगाची मोबाईल शुटींग करत तो तिच्यासोबत अनैसर्गीक कृत्य करु लागला. त्याच्या या नेहमीच्या प्रकाराला कंगना वैतागली. तिला वेदना असह्य होऊ लागल्या.

अखेर 4 एप्रिल रोजी ती तिच्या माहेरी निघून आली. माहेरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईजवळ कथन केला. आपल्या जावयाला अद्दल घडवण्यासाठी तिने मुलगी कंगनाला धिर देत पोलिस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. विचाराअंती आपल्या आईसोबत कंगनाने 14 मे रोजी जळगाव शहर पोलिस स्टेशन गाठले. आपल्यावर गुदरलेला प्रसंग तिने पोलिस स्टेशन अधिका-यांसमक्ष कथन केला. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीविरुद्ध रितसर कायदेशीर  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here