वान्टेड आरोपी एलसीबीच्या ताब्यात

On: May 19, 2021 5:51 PM

जळगाव : रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार व हवा असलेला आरोपी गौतम मनोहर लहाने (पांडव नगरी सम्राट स्वीटजवळ राधास्मृती अपार्टमेंट नाशिक) यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. अटकेतील गौतम लहाने याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गु.र.न. 163/2018 भा.द.वि. 420, 465 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून गौतम लहाने हा फरार होता.

फरार असलेला गौतम लहाने हा नाशिक येथे त्याच्या राहत्या घरी आला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहका-यांना त्याच्या मागावर रवाना केले होते. त्यानुसार स.फौ.राजेद्र पाटील, पो.हवा.अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी पो.ना.रावसाहेब पाटील यांनी त्याचा माग काढत नाशिक गाठले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक इंदीरा नगर पोलिस स्टेशनला तशी नोंद घेत त्याला वैद्यकीय तपासणीअंती जळगाव येथे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या समक्ष हजर करण्यात आले. पुढील तपासकामी त्याला रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment