एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने खळबळ

On: May 19, 2021 10:25 PM

जळगाव – धुळे : एकाच कुटूंबातील तिघा जणांनी तापी नदीत उडी घेत सामुहिक आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे जळगाव – धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यातील दमाशी येथील तापी नदीच्या पुलावरुन उडी घेत ही आत्महत्येची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील भोद येथील रहिवासी रायभान देसले, त्यांची पत्नी व मुलगी असे नदीत उडी घेणारे सदस्य आहेत. आर्थिक ओढाताण हे आत्महत्येचे कारण म्हटले जात आहे.

आत्महत्या करणारे राजेंद्र रायभान देसले हे धरणगाव-एरंडोल तालुका शेतकरी संघाचे संचालक असल्याचे समजते. ते आपल्या पत्नी वंदना व मुलगी ज्ञानल यांच्यासह अमळनेर येथे काही कामानिमित्त आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर तिघे जण आपल्या कारने भोद येथे जाण्यास निघाले होते. प्रवासात त्यांचा मोबाईल बंद झाला.
नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांची कार तापी नदीच्या पुलाजवळ आढळून आली. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर तिघांचे मृतदेहच पाण्यात आढळून आले. अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment