स्टेट बॅंकेची डिजीटल सेवा दोन दिवस बंद

On: May 20, 2021 8:12 PM

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देशातील आपल्या करोडो ग्राहकांसाठी एक सुचना जारी करण्यात आली आहे. बॅंकेची डिजीटल सेवा 21 ते 23 मे दरम्यान बंद राहणार असल्याबाबत बॅंकेने आपल्या ट्विटर हॅंडलच्या माध्यमातून कळवले आहे. 21 मे रोजी रात्री 10.45 ते 23 मे रोजीच्या दुपारी 1 वाजेपर्यंत बॅंकेची वेबसाईट मेंटेनन्स साठी बंद राहील. या कालावधीत ग्राहकांना आयएनबी, योनो, योनो लाईट व युपीआय या सेवेचा वापर करता येणार नाही. याशिवाय बॅंकेने आपल्या ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मे ही अखेरची तारीख दिली आहे. ग्राहक आपले केवायसी डॉक्युमेंट पोस्ट अथवा मेलद्वारे देखील सादर करु शकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment