दिराच्या हल्ल्यात वहिणी ठार

On: May 21, 2021 10:54 PM

जळगाव : जळगाव शहरातील मयुर कॉलनी – पिंप्राळा परिसरात दिराने कु-हाडीने केलेल्या हल्ल्यात वहिणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात खळबळ माजली आहे.

योगिता मुकेश सोनार (39) असे मयत विवाहितेचे नाव असून दिपक लोटन सोनार (38) असे हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. त्याला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत योगिता सोनार यांच्या पतीचे काही महिन्यापुर्वी अपघाती निधन झाले असल्याचे समजते. घरातील नेहमीच्या वादातून हा जिवघेणा हल्ला झाला असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो. नि. अनिल बडगुजर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कायदेशीर कारवाई सुरु होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment