सांगली : दारुच्या नशेत आम्ही पोलिस आहोत, आम्ही वाहने चेक करत आहोत असे मोठमोठ्याने ओरडून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचा-याला निलंबीत करण्यात आले आहे. इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. सांगली स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलिस नाईक किशोर रघुनाथ कदम यास पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांनी निलंबित केले आहे. त्याच्यासोबत गोंधळ करणा-या जहांगीर सलिम शेख (34) रा. मंगळवार बाजार व अझर बिलाल शेख (26) रा. अभय नगर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
वैद्यकीय तपासणीत तिघे मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आले. कॉलेज कॉर्नर सुरु असलेल्या या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. अजय सिंदकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. या ठिकाणी तिघे वाहने अडवून मद्याच्या नशेत आरडाओरड करत असल्याचे पोलिस पथकास आढळून आले.