जयजीत सिंह ठाण्याचे पोलिस आयुक्त, विनीत अग्रवाल एटीएस सुप्रिमो

On: May 25, 2021 10:05 AM

मुंबई : ठाण्याचे पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणारे विवेक फणसाळकर यांची पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार याची पोलिस दलात उत्सुकता होती. एटीएसचे प्रमुख जयजीत सिंह यांची ठाणे पोलिस आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे.

रिक्त झालेल्या एटीएस प्रमुखपदी गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) विनीत अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अग्रवाल यांच्या जागी राज्य पोलीस दलातील विशेष अभियान विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना आले आहेत. जयजीत सिंह हे सन 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी एटीएस प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाची देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय मुंबई रेल्वे पोलीस अतिरिक्त महासंचालक म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिले आहे. ‘अँटलिया’ स्फोटके प्रकरणी तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment