सोलापूर : पोलिस कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह असल्यामुळे तो रुग्णालयात उपचार घेत असल्याचा गैरफायदा घेत त्याच्या पत्नीवर पोलिस शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोलापूर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीतेने फौजदार चावडी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी मल्लीकार्जुन भालेकर असे संशयीत पोलिस शिपायाचे नाव आहे.
पुर्वी सोलापूर शहर वाहतुक शाखेत कार्यरत असलेला रवी भालेकर सध्या सोलापूर शहर पोलिस स्टेशनला कार्यरत आहे. पिडीतेचा पती व संशयीत आरोपी हे दोघे पोलिस कर्मचारी एकाच पोलिस वसाहतीत रहिवासाला आहेत. यातून दोघा परिवाराची ओळख झाली होती. या घटनेच्या निमीत्ताने अहमदनगर पोलिस दलातील घटनेची अनेकांना आठवण झाली. अहमदनगर पोलिस दलात काही महिन्यापुर्वी घडलेल्या एका घटनेत एका पोलिस कर्मचा-याने आत्महत्या केली होती. सोलापूर येथील या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस शिपाई रवी भालेकर यास अटक करण्यात आली आहे.