क्रिकेट सट्टेबाजाने परमबीर सिंगांविरुद्ध नोंदवला जबाब

मुंबई : मुंबईचे वादग्रस्त माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर क्रिकेट सट्टेबाज सोनु जालान याने सीआयडी कडे दिलेल्या जवाबाच्या माध्यमातून गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आहेत.

एखाद्या मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना दहा कोटी रुपये दे, असे परमबीर सिंग यांच्याकडून जालान यास सांगण्यात आले होते, तसा जवाब सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला आहे. जालान याच्याकडून परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार यांच्यावर वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत. जालान याने दिलेल्या जवाबात म्हटले आहे की मे 2018 मधे एका सट्टेबाजीच्या प्रकरणात जालान यास ठाणे पोलिसांच्या अ‍ॅंटी एक्स्टॉर्शन सेलकडून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर जालान यास तत्कालीन ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी परमबीर सिंग यांनी जालान यास भारतीय सक्रिय क्रिकेट सट्टेबाजांची नावे विचारत एका बड्या प्रकरणात अटकेची धमकी दिली होती. या अटकेपासून बचावासाठी पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडे दहा कोटी देण्यास सांगितले होते. अशा स्वरुपाचा जवाब जालान याने सीआयडीकडे नोंदवला आहे. या आरोपाची चौकशी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here