पुष्पक एक्सप्रेसच्या वेगाने हादरले रेल्वे स्टेशन, कोसळली इमारत

बुरहानपुर : मध्य प्रदेशातील बुरहानपुर नजीक असलेल्या चांदनी रेल्वे स्टेशनला भरधाव वेगातील रेल्वेमुळे जोरदार हादरे बसून इमारत कोसळल्याची घटना काल 26 मे रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

चांदनी रेल्वे स्थानकावरुन जाणा-या पुष्पक एक्सप्रेसचा वेग ताशी 110 कि.मी. एवढा होता. या भरधाव गाडीच्या वेगामुळे रेल्वे स्थानकाला जोरदार हादरे बसले व स्टेशन हादरुन इमारतीला तडे गेले व काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेच्या वेळी या इमारतीत कुणी हजर नव्हते. अन्यथा प्राणहाणी अटळ होती. नेपानगर ते असीरगड स्टेशनच्या दरम्यान असलेल्या चांदनी रेल्वे स्थानकात ही घटना घडली. बुऱ्हानपूर येथील चांदनी रेल्वे स्थानकाची इमारत एका रेल्वे गाडीच्या वेगाने हादरे बसून कोसळल्याची घटना घडली आहे. ही रेल्वे गाडी तब्बल 110 किमी प्रति तास वेगाने येथून गेली. महत्वाचे म्हणजे, घटनेच्या वेळी या इमारतीत कुणीही नव्हते. चांदनी रेल्वे स्थानकाच्या जुन्या इमारतीचे बांधकाम धावत्या रेल्वेचे धक्के सहन करु शकले नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here