पतंजली खाद्यतेलाचा राजस्थानातील कारखाना सील

योग गुरु रामदेवबाबा यांच्या राजस्थानातील मोहरी तेलाच्या कारखान्यावर राजस्थान सरकारने मध्यरात्री छापा घालत कारखाना सिल केला आहे. बाबा रामदेव यांच्या पंतजली ब्रॅंड असलेल्या कारखान्यातील मोहरीच्या तेलात भेसळ असल्याचे छाप्यात उघड झाले आहे. त्यामुळे हा कारखाना सिल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. जिल्हाधिका-यांच्या अख्त्यारीत या छाप्याचे चित्रीकरण देखील करण्यात आले.

बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारावर टीकाटीपण्णी केल्यानंतर आयएमए कडून 1 हजार कोटी रुपयांच्या मानहाणीचा दावा ठोकण्यात आला. त्यानंतर बाबा रामदेव राजस्थान सरकारच्या रडारवर आले. पंतजली निर्मीत मोहरीच्या तेलाची जाहीरातबाजी करण्यास खाद्य तेल उद्योग संघटनेकडून जोरदार आक्षेप देखील घेण्यात आला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजली निर्मीत मोहरीच्या तेलाच्या जाहीरातीत आमचेच उत्पादन चांगले व इतर तेलात भेसळ असल्याचा दावा करण्यात आला होता. राजस्थानातील अल्वर जिल्ह्यातील खैरथलमधे तयार होत असलेल्या तेलात भेसळ असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सिंघानिया ऑईल मिलवर छापा घालत कारखाना सिल करण्यात आला. या कारखान्यात पंतजली तेलाचे पॅकेट्स जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here