जालना : भाजपा कार्यकर्त्यास केलेल्या बेदम मारहाण प्रकरणी पोलिस उप निरीक्षकासह 5 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहे. भाजप कार्यकर्ता शिवराज नरियलवाले यास पोलिसांनी दांडके तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारीत झाला. या प्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली.
या मारहाणीची व्हिडीओ बघून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक संताप व्यक्त केला. पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी गंभीर दखल घेत पोलिस उप निरीक्षक भागवत कदम, कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळुंखे आणि महेंद्र भारसाकळे यांना निलंबित केले आहे. मात्र पोलिस निरिक्षक प्रशांत महाजन यांच्यावर कारवाई होणर काय असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजप कार्यकर्ते शिवराज नारियलवाले 9 एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीच्या उपचारासाठी आले होते. दरम्यान एका युवकाचा दवाखान्यात मृत्यू झाला होता. त्यावेळी मयताच्या नातेवाईकांना शिवीगाळ सुरु होती. शिवीगाळ होत असलेल्या घटनेची चित्रफीत नरीयलवाले यांनी केली होती. त्याचा राग आल्याने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.