पळून जाणा-या गुन्हेगार महिलेचे रेल्वे ट्रॅकवर पोलिसाने वाचवले प्राण

On: May 29, 2021 11:59 AM

मुंबई : पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाणा-या गंभीर गुन्ह्यातील महिलेचा प्लॅटफॉर्मवर तोल गेल्याने ती रेल्वे ट्रॅकवर पडली. त्याचवेळी लोकल आली. मात्र प्रसंगावधान राखत ड्युटीवरील पोलिसाने तिचे प्राण वाचवले आणि तिला ताब्यात देखील घेतले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील ही घटना असून रेल्वे पोलिस आणि लोकल ट्रेनचा मोटारमन या दोघांच्या सतर्कतेने गुन्हेगार महिलेचा जिव वाचला. या महिलेचा पळून जाण्याचा बेत फसला असला तरी तिचे लाखमोलाचे प्राण वाचले. अन्यथा ती लोकलखाली आली असती व तिचा जिव गेला असता. या घटनेचा बघा व्हिडीओ……….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment