मुंबई : सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता अर्थात बबीता विरुद्ध अंधेरी येथील अंबोली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा अनुसुचित जाती – जमाती कायद्यान्वये कलम 295 (अ) नुसार दाखल झाला आहे. छोट्या पडद्यावर गेल्या तेरा वर्षापासून सुरु असलेल्या “तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेतील जेठालाल या पात्रास आपल्या सौंदर्याच्या बळावर घायाळ करणारे बबीताचे पात्र साकारणारी मुनमुन दत्ता सध्या अडचणीत सापडली आहे.
काही वर्षापुर्वी मुनमुन दत्ताने एका व्हिडीओच्या माध्यमातून एका विशीष्ट समाजाबद्दल भाष्य केले होते. तिचा तो व्हिडीओ त्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. त्या व्हिडीओतील त्या वक्तव्यामुळे मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी करण्यात आली होती. यापुर्वी मुनमुन विरुद्ध पौरी पोलिस स्टेशनला अखिल भारतीय युवा कोळी समाज संघटनेच्या वतीने एक तक्रार देखील नोंद करण्यात आली होती. अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने त्या व्हिडीओतील वक्तव्यामुळे दुखावलेल्या व्यक्तीकडे दिलगिरी देखील व्यक्त केली होती. मात्र त्याचा काहीही परिणाम तिला दिसून आला नाही. माफी मागणा-या पोस्टमधे तिने म्हटले होते की मला त्या वक्तव्याचा अर्थ नंतर कळला असून मी तो भाग लगेच काढून देखील टाकला. आपणास प्रत्येक जाती धर्माच्या आणि वंशाच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदरभाव आहे. नॅशनल अलायंस फॉर दलित हुमन राइट्सचे संयोजक रजत कलसन यांनी म्हटले आहे की मुनमुन दत्ता या अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स असून तिने आपल्या समाजाला दुय्यम दाखवण्यासाठीच असे वक्तव्य केले आहे.