पोलिस निरीक्षकासह पाच जणांवर 302 चा गुन्हा, पिएसआय फरार

On: May 29, 2021 6:14 PM

गोंदिया : गोंदीया जिल्ह्यातील आमगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस कोठडीतील संशयिताचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीअंती तिघा पोलिसांना भा.द.वि. 302 या कलमाखाली अटक करण्यात आली आहे. अटकेच्या भितीने पोलिस उप निरीक्षक फरार झाला आहे. या अटकसत्रामुळे गोंदीया पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गोंदीया जिल्ह्यतील आमगाव पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या कुंभारटोली येथील राजकुमार अभयकुमार धोती या गुन्हेगारावर अनेक गुन्हे दाखल होते. त्याला अटक करण्यात आली होती. तो आमगाव पोलिस स्टेशनच्या कोठडीत होता. कोठडीत असतांना त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला जात होता. पोलिस कोठडीत असतांना त्याच्या मृत्यूप्रकरणी सीआयडीकडे तपास देण्यात आला होता. कोठडी दरम्यान झालेल्या मारहाणीत धोती याचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले होते.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुभाष चौहान , सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तातय कांबळे आदींविरुद्ध भा.द.वि. 302, 330, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेच्या भितीने पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव पसार असल्याने त्यांची अटक बाकी आहे. अटकेतील सर्वांना न्यायालयात हजर केले असता सर्वांना 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment