जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी व पाचोरा पोलिस स्टेशन येथे दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
यापुर्वी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयात निष्पन्न झालेला व अटक करण्यात आलेल्या पारदर्शक उल्हास पाटील (रा. पिंपळगाव – जामनेर) याने चोरी केलेली मोटार सायकल पहुर येथील इसमाच्या ताब्यात असल्याचे उघडकीस आले. त्या माहितीच्या आधारे पारदर्शक पाटील याने चोरी केलेली मोटार सायकल पहुर येथील इसमाकडून ताब्यात घेण्यात आली. या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.अशोक महाजन, प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, दिपक पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील,सचिन महाजन, मुरलीधर बारी यांनी तपासकामात सहभाग घेतला. सदर मोटार सायकल एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे.
दुस-या तपास पथकाने केलेल्या कामगिरीत पहुर पेठ ता. जामनेर येथील नासिर शेख सलिम शेख यास मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून पॅशन प्रो ही चोरीची मोटार सायकल ताब्यात घेण्यात आली आहे. सदर मोटार सायकल चोरीचा गुन्हा पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल आहे. या तपासकामी पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.अशोक महाजन, प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, दिपक पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी आदींनी सहभाग घेतला. सदर चोरीची मोटार सायकल व अटकेतील आरोपी नासिर शेख सलीम शेख यास पाचोरा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.