कंगनाच्या बॉडीगार्डला अटक

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवत महिला मेकअप आर्टीस्टवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री कंगना रणौतचा अंगरक्षक कुमार हेगडे यास अटक करण्यात आली आहे. मुंबईतील डीएन नगर पोलिस स्टेशनला बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस पथक त्याच्या मागावर होते. पोलिसांनी त्याला त्याच्या मंड्याच्या हेगडाहली या गावात जाऊन अटक केली आहे. कुमार हेगडे याने नंतर पिडीत मेकअप आर्टिस्ट महिलेसोबत संपर्क तोडून टाकला होता. बलात्काराव्यतिक्त कुमारने पिडीतेकडून पन्नास हजार रुपये देखील घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मेकअप आर्टीस्ट महिलेची व कुमार हेगडे या दोघांची मागील वर्षी जुन महिन्यात एका सिनेमाच्या शुटींग़ दरम्यान ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर सहवासात आणि हळूच प्रेमात होण्यास वेळ लागला नाही. सहवासा दरम्यान दोघात प्रेमाची पालवी बहरली. प्रेम बहरत असतांना लग्नाचे आमिष दाखवत आपल्यावर कुमारने बलात्कार केल्याचा आरोप पिडीत महिलेने केली आहे. तिने कुमारला लग्नाची मागणी घातली असता त्याने तिला लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहण्यास म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here