मुंबई : जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या उपाध्यक्षपदी पत्रकार के. रवी (रवी दुपारगुडे) यांची निवड झाली आहे. श्री,सह्याद्री, मनोहर कहानियां, मधुर कथाएं, तहलका अशा विविध लोकप्रिय साप्ताहिक व मासिकांमधून त्यांचे लिखान प्रसिद्ध झाले आहे. नवोदीत पत्रकारांना मार्गदर्शन करणे, त्यांना त्यांच्या कामात योग्य ते प्रोत्साहन देणे ही सर्व कामे पत्रकार के. रवी यांनी केली असून ते आजही करत आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन कालावधीत गरजू पत्रकारांना त्यांनी यथोचित मदत केली होती. त्यांच्या या निवडीबद्दल अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्यासह समाजातील सर्व थरातून अभिनंदन केले आहे.