मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीत आपला काळ गाजवणारी व सध्या ऑर्गॅनिक शेती करणारी बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला हिने भारतात येऊ घातलेल्या “5G” तंत्रज्ञानाला तक्रारीच्या माध्यमातून विरोध केला आहे. या तंत्रज्ञानाचा नागरिकांसह पशु पक्षांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार असल्याचे जुहीचे म्हणणे आहे. या प्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या केसची आज पहिली सुनावणी आहे.
भारतात 5G तंत्रज्ञान येण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. जुही पर्यावरणाविषयी जागरुक असते. जुहीच्या म्हणण्यानुसार या तंत्रज्ञानामुळे अनेकांना आजार होऊ शकतात व आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. वायरलेस गॅझेट व नेटवर्कींग सेल टॉवर्सच्या माध्यमातून निर्माण होणारी किरणे अतिशय हानिकारक असल्याचे संशोधनात आढळून आले असल्याचे जुही चावला हिचे म्हणणे आहे.