जळगाव पोलिस दलातून आज चौघे अधिकारी सेवानिवृत्त

On: May 31, 2021 2:23 PM

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलातील प्रदिर्घ सेवेतून आज एक डीवायएसपी व तिन पोलिस उप निरीक्षक सेवानिवृत्त होत आहेत. पोलिस दलातर्फे आज चौघांना निरोप देण्यात येत आहे.

चोपडा उप विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग, एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, अडावद पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस उप निरीक्षक गोकुळसिंग बयास तसेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक मगन मराठे अशा चौघांचा सेवानिवृत्तीच्या यादीत समावेश आहे. चोपडा उप विभागाचा अतिरिक्त पदभार अमळनेरचे डिवायएसपी राकेश जाधव यांचेकडे सोपवण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment