अयोध्या नगरात तरुणाची आत्महत्या

On: June 2, 2021 9:57 AM

जळगाव : अयोध्या नगर भागातील रहिवासी तरुणाने आज गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

हर्षल प्रेमनाथ महाजन (29) असे आत्महत्या केलेल्या मयत तरुणाचे नाव असून तो अयोध्या नगरातील तृप्ती कॉर्नर नजीक सद्गुरु नगरात रहात होता. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अंमलदार हेमंत कळसकर व चंद्रकांत पाटील यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिस तपास सुरु होता. हर्षल महाजन या तरुणाने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली याचा तपशील समजू शकला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment