विनामुल्य कोविड तपासणी शिबीर उत्साहात

On: June 3, 2021 12:14 PM

जळगाव : इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जनमत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विनामुल्य कोविड – 19 तपासणी शिबीर नुकतेच उत्साहात झाले. जळगाव शहराच्या मुक्ताईनगर कॉलनी प्रभाग 9 मध्ये या विनामूल्य कोविड – 19 शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीराचे उद्घाटन विवेक सोनवणे यांच्या हस्ते तर शुभारंभ मुक्ताई महिला संस्थेच्या अध्यक्ष व नगरसेविका नीताताई मंगलसिंग सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस विभागाचे विश्वास पवार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा या प्रसंगी कॉलनीवासियांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे योगेश सपकाळे, दिनेश तेजी आदींचे सहकार्य लाभले. पोलीस सेवा संघटनेच्या हर्षाली पाटील, अंबुबाई शांताराम पाटील, शांताराम पाटील, सागर कोळी, राजेंद्र कुमार वर्मा, संजय कुमार सिंग, आर. सी. पाटील, राहुल निकम, विजय सोनवणे, हेमंत वैद्य, राहुल लोखंडे, गणेश फेगडे, शक्ती महाजन, अनुजा निकम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन पंकज नाले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी प्रभागवासियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी अ‍ॅंटीजेन तपासणी करुन घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment