ठाणे : अभिनेत्री प्रियंका चोप्राची बहिण मिरा चोप्राने फ्रंट लाईन वर्कर असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवत कोविड लस घेतल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. अभिनेत्री मिरा चोप्रासह जवळपास 21 धनदांगडग्यांनी आपण फ्रंटलाईन वर्कर असल्याचे बनावट ओळखपत्र सादर करत लस घेतल्याचे उघड झाले आहे.
ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा यांनी या या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर समितीने अहवाल सादर केला. यात अनेक सेलीब्रेटींनी बनावट ओळखपत्राच्या आधारे लस घेतल्याचे उघड झाले आहे. राज्यात लसीचे प्रमाण कमी असल्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद आहे. असे असतांना देखील अभिनेत्री मिरा चोप्राने आपण कोविड सेंटरमधे सुपरवायझर असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवत लसीकरण करुन घेतल्याचे उघड झाले. ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता.