मुंबई : राज्यात ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांहून कमी आहे त्या जिल्ह्यात 100% अनलॉक केलं जाणार आहे. राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सदर घोषणा केली आहे. मुंबई येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पहिल्या टप्प्यात एकूण 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधे धुळे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात आता पूर्णपणे अनलॉक होणार असून त्याची अंमलबजावणी होणार आहे.