फळ विक्रेत्याला १५ लाखांना गंडा

On: July 9, 2020 6:49 PM

पुणे : बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने फळ विक्रेत्याला तब्बल १४ लाख ५० हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे.

सायबर चोरटे फळ विक्रेत्याच्या खात्यातून सलग ८ दिवस पैसे काढत होते. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.फिर्यादी हे घाऊक फळ विक्रेते असून कोथरुडमध्ये राहतात. गेल्या महिन्यात त्यांना सायबर चोरट्याचा फोन आला होता.

आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्यांचा एटीएम कार्ड अपडेट करण्याचा बहाणा करत चोरटयाने त्यांच्या कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वर्ग करुन घेतली. याबाबत फोनवर चौकशी केली असता फळ विक्रेत्याला एटीएम अपडेट होत असल्याचे कारण सांगण्यात आले.

आपली रक्कम पुन्हा जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसानंतर खात्यात पुन्हा पैसे जमा झाले नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर फळ विक्रेत्याने सायबर पोलिसांकडे तकार दाखल केली. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.

लोक हे देखील वाचतात बोदवड येथील चोरीप्रकरणी चोरटा गजाआड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment