बेपत्ता अल्पवयीन मुलगी सापडली मध्यप्रदेशात

जळगाव : गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 690/20 भा.द.वि. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी करत होते. तपासादरम्यान पोलिस पथकाने फिर्यादीच्या नातेवाईकांकडे मंगरुळ, धुळे, नंदूरबार, उधणा (गुजरात), साईखेडी (मध्यप्रदेश) अशा विविध ठिकाणी शोध घेतला. अखेर ती अल्पवयीन बेपत्ता मुलगी 31 मे 2021 रोजी साईखेडी (मध्यप्रदेश) येथे तिच्या नातेवाईकांकडे आढळून आली असून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या तपासात पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाटील, हे.कॉ. नरेंद्र वारुळे, पोलिस नाईक संदीप साळवे यांनी सहभाग घेतला. याशिवाय अमळनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गंभीर शिंदे, हे.कॉ. कैलास शिन्दे, पोलिस नाईक योगेश महाजन यांचे स्वतंत्र पथक देखील कार्यरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here