नवी दिल्ली : 5 जी तंत्रज्ञानामुळे पर्यावरणासह लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार असल्याचे न्यायालयास सांगणारी अभिनेत्री जुही चावला हिस न्यायालयाने 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अभिनेत्री जुही चावला हिने दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या जनहित याचिकेवरुन दिल्ली उच्च न्यायालयाने जुही चावला हिस फटकारत विस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जुहीचा हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अभिनेत्री जुही चावलाचे म्हणणे होते की भारतात 5 जी तंत्रज्ञानाबाबत बारकाईने विचार केला पाहिजे. त्यानंतरच आपल्या देशात या 5 जी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करता येऊ शकते. जुहीची ही मागणी न्यायालयाने फेटाळली असून तब्बल 20 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. जुहीचा हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा एक स्टंट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. प्रसिद्धीसाठी जुहीने सुनावणीची लिंक समाज माध्यमांवर प्रसारीत केली असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.