बुलढाणा : राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा विभागाने गेल्यावर्षी देशी विदेशी मद्य साठ्यासह दोघांना अटक केली होती. दादर नगर हवेली, दमण निर्मीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या मद्याचा साठा सुमारे सव्वा लाख रुपयांचा साठा दिपक वासुदेव खर्चे व सुधाकर वामन फेगडे या दोघांकडून जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी दोघांना रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्हयातील मुख्य सुत्रधार निना किसन किनगे हा फरार होता. फरार कालावधीत त्याने मलकापूर अतिरिक्त व सत्र न्यायालयासह नागपूर खंडपिठात अटकपुर्व जामिनासाठी प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्याला यश आले नाही. त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोई किनगे याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत निरीक्षक एन.एल शिंदे, दुय्यम निरीक्षक ए.आर.आडळकर, पी.व्ही. मुंगडे, जवान अमोल तिवाने, परमेश्वर चव्हाण, निलेश देशमुख, वाहनचालक जवान राजु कुसळकर, विशाल पाटील यांनी सहभाग घेतला.