अभिनेता पर्ल पुरीला अटक

On: June 5, 2021 11:35 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील एकता कपूरचा शो “नागिन 3” फेम अभिनेता पर्ल पुरी यास बलात्काराच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. ‘नागीन 3’, ‘बेपनाह प्यार’ अशा विविध मालिकांमध्ये अभिनय केलेल्या पर्ल पुरी याच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप आहे.

सन 2013 मधे “दिल की नजर से खुबसुरत” या शो च्या माध्यमातून पर्ल याने अभिनयाला सुरुवात केली होती. फिर ना माने बदतमीज दिल से या शो मधे त्याला मुख्य भुमिका मिळाली होती. नागार्जुन एक योद्धा यासह बेपनाह प्यार या शो मधे देखील त्याच्या भुमिका गाजल्या होत्या. एकता कपूरच्या “नागिन 3” च्या माध्यमातून पर्ल यास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. ‘ब्रह्मराक्षस 2’ मध्ये अंगद मेहराची व्यक्तिरेखा पर्ल निभावत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment