७ किलोमीटर अंतर, 8 हजार रुपये भाडे संजीवनी अ‍ॅम्बुलन्सवर गुन्हा दाखल

काल्पनिक छायाचित्र

पुणे : बिबवेवाडी ते कर्वेनगर कोविड सेंटर या अवघ्या सात किलोमिटर अंतरासाठी तब्बल आठ हजार रुपये भाडे आकारण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हडपसर येथील संजीवनी अ‍ॅम्बुलन्सवर बिबवेवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक धनंजय गोसावी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

बिबवेवाडी येथील सहयाद्री हॉस्पिटल ते दिनानाथ हॉस्पिटल हे अवघे सात कि.मि. चे अंतर आहे. या सात कि.मी. अंतराचा टप्पा पार करण्यासाठी  कोरोना बाधीत रुग्णाकडून संजीवनी अ‍ॅम्बुलन्सने ८ हजार रुपये वसुल केले. याशिवाय आणखी १ हजार १०० रुपयांची मागणी करण्यात आली होती. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ८ हजार रुपये द्यावे लागले होते़.  २५ जून रोजी घडलेल्या या प्रकाराबाबत सोशल मिडीयावर बिले व्हायरल झाली होती.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अ‍ॅम्बुलन्सवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली. आरटीओने ही अ‍ॅम्बुलन्स जप्त केली आहे़.

हे देखील वाचा दोन लाखांची लाच भोवली दोघे अधिकारी अडकले सापळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here