जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अट्टल मोटार सायकल चोरट्यास अटक केली असून त्याच्या ताब्यातून 24 मोटार सायकली जप्त केल्या आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेले 15 गुन्हे देखील उघडकीस आले आहेत.
चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील गणेश बुधा पावरा असे अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बोरमळी गावाच्या जंगलातून ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपासकामी त्याला चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटकेतील गणेश पावरा याने जळगाव शहर, जळगाव तालुका, शनिपेठ, अडावद, चोपडा शहर, जिल्हापेठ आदी पोलिस स्टेशन हद्दीतून मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले आहेत. ते गुन्हे उघड झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.अशोक महाजन, श्रीकृष्ण पटवर्धन ,अश्रफ शेख, सुनिल दामोदरे प्रदीप पाटील , किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दिपक शिंदे, मुरलीधर बारी , वसंत लिंगायत उमेशगिरी गोसावी यांनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याच्या तपासकामात बोरमळी तालुका चोपडा येथील बाबुराव बुटा पाडवी यांची तपासपथकाला मदत झाली आहे.