“फुलाला सुगंध मातीचा” मालिका सापडली वादात

मुंबई : फुलाला सुंगध मातीचा ही छोट्या पडद्यावरील मालिका सध्या वादात सापडली आहे. या मालिकेतील काही दृश्यांविरुद्ध एलजीबीटी कम्युनिटीने तक्रार दाखल केली आहे. या दृश्यांच्या माध्यमातून भावना दुखावल्या गेल्या असून अवमान केला जात असल्याचा आरोप करण्यात आला असून कायदेशीर तकार देखील करण्यात आली आहे.

छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका महिला वर्गाच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत शुभम नावाचे पात्र अभिनीत करणारा अभिनेता हर्षद अतकरी आहे. सध्या सुरु असलेल्या कथानकात त्याने एका पाककलेच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत सॅंडी नावाचा एक प्रतिस्पर्धी असून तो समलैंगिक आहे. त्याच्या समलैंगिकतेवरुन सुरु असलेल्या या मालिकेत त्याची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्पर्धेदरम्यान सॅंडी व शुभमची आई जीजी अक्का यांच्यातील संवादामुळे निर्माण झालेल्या वादातून एलजीबीटीक्युआयए या कम्युनिटीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या संवादात जीजी अक्का त्याला त्याच्या बांगड्या व दागिने व मेकअपचे सामान बहिणीला देण्यास सांगते. या मालिकेच्या निर्मात्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नसल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here