अल्पवयीन मुलास झाडाला बांधून बेदम मारहाण

On: June 8, 2021 11:01 PM

जळगाव : शेतातील कै-या तोडल्याच्या रागातून अल्पवयीन मुलास झाडाला बांधून त्याला रखवालदाराने बेदम मारहाण केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील अंजनविहीरे या गावी घडला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्या मुलाच्या अंगावर लघुशंका देखील करण्यात आल्याचा आरोप संबंधीत अल्पवयीन मुलाने केला आहे. या निंदनीय आणी तेवढ्याच संतापजनक असलेल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.

दोन तास मुलाला बांधून ठेवण्याच्या या घटनेबाबत शेतमालक गोपी उर्फ विवेक रविंद्र पाटील व रखवालदार प्र्विण पावरा (दोघे रा. अंजनविहीरे ता. भडगाव) यांच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम देखील लावण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment