सलमान खान – कॅटरिना कैफ या बॉलीवुड मधील जोडगोळीच्या अभिनयावर आधारीत टायगर 3 या बिग बजेट चित्रपटाच्या सेटचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका या चित्रपटाच्या सेटला बसला आहे. सेटची मोडतोड झाल्यामुळे एसकेएफ प्रॉडक्शनच्या निर्मात्याचे मोठे नुकसान झाले आहे.
लॉकडाऊन पुर्वी या चित्रपटाच्या सेटची तयारी पुर्ण करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे चित्रपटाच्या निर्मीतीचे काम स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर तोक्ते वादळामुळे हा सेट पुर्णपणे कोसळला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जेमतेम चित्रीकरणाला सुरुवात करण्यापुर्वीच मुसळधार पावसामुळे सेटचे नव्याने नुकसान झाले आहे. कोसळलेला हा सेट दुस-या वेळेस तयार केल्यानंतर आता मुसळधार पावसामुळे पुन्हा कोसळला आहे. या सेटची तयारी करण्याकामी सुमारे तिनशे कामगारांची फौज लावण्यात आली होती. मात्र त्याचा देखील उपयोग झाला नाही.
हे देखील वाचा…………..
जिजा का पिझ्झा नावाने व्हिडीओ केला अपलोड !- दिग्दर्शकासह तिघांवर पोलिसात गुन्हा झाला लोड !!
सलमान खान अभिनीत टायगर सिरीजचा हा तिसरा भाग आहे. या चित्रपटात सलमान खानसमवेत कॅटरीना कैफचा अभिनय बघण्यास मिळणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भुमीकेत आहे. वारंवार होणा-या नुकसानामुळे या चित्रपटाचे बजेट देखील वाढत असून चित्रीकरणाला विलंब होत आहे. त्यामुळे या वर्षात या चित्रपटाचे काम पुर्ण होणार का अशी शंका उपस्थीत केली जात आहे.