अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : अल्पवयीन बालिकेला फुस लावून पळवून नेत अत्याचार करणा-या आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. साहील जावेद शेख (22) खडसे नगर म्हसावद ता. जि. जळगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात अल्पवयीन बालिकेला म्हसावद येथून फुस लावत पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुरुवातीला एमआयडीसी पोलिसात पिडीतेच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आरोपी साहील जावेद शेख यास शिताफीने 8 जून रोजी अटक केली आहे. साहील याने पिडीतेला म्हसावद येथून फुस लावत शिरुर पुणे येथे पळवून नेले होते. पुणे येथे ठार करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचे पिडीतेने स्पष्ट केले आहे. याबाबत तिने अध्यक्ष बालकल्याण समिती यांच्यासमक्ष तसा जवाब दिला आहे. त्यानुसार आरोपी साहील जावेद शेख याच्याविरुद्ध भा.द.वि. 376, 504 सह पोक्सो कायदा कलम 4 व 6 हे कलम वाढवण्यात आले आहे. याप्रकरणी पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अमोल भाऊसाहेब मोरे व त्यांचे सहकारी रतीलाल पवार तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here