जळगाव : रिक्षातून प्रवास करतांना प्रवाशास लुटणा-या मोहसीन खान नुरखान व शाहरुख शेख रफीक या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. ए. एस. शेख यांनी अटकेतील दोघा आरोपीतांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच अटकेतील दोघांकडून आज पाच हजार रुपये देखील हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील मोहसीन खान नुरखान हा जळगाव शहरातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आला होता. हद्दपारी कालावधीत त्याने सदर गुन्हा केल्याचे तपासात उघड झाले आहे. अशाच स्वरुपाचा एक गुन्हा जळगाव शहर पोलिस स्टेशनला 2 जुन रोजी दाखल झाला आहे. सदर गुन्ह्यात देखील या आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या गुन्ह्यातील अशरफ गफ्फार पिंजारी व हर्षद उर्फ अण्णा मुलतानी या दोघा फरार आरोपींचा कसून शोध सुरु आहे. लवकरच त्यांना अटक केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या गुन्ह्याप्रकरणी सरकारतर्फे न्यायालयीन कामकाज अॅड. प्रिया मेढे यांनी पाहिले. पो. नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, मुकेश पाटील, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, हेमंत कळसकर, साईनाथ मुंढे यांनी तपासकामी सहभाग घेतला.