जळगाव जिल्ह्यात 25 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम

On: June 11, 2021 9:05 PM

जळगाव (जिमाका वृत्त सेवा) : जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 25 जून, 2021 पावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी जारी केले आहे.

या कालावधीत पाच अथवा त्यापेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास मनाई आहे. संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेश शासकीय कार्यक्रम, अंत्ययात्रा यांना लागू राहणार नाही. शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना सदर आदेश लागू होणार नसल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment