जळगाव : आत्मिक समाधान हाच सर्वोच्च पुरस्कार असतो. कार्यकर्त्यांनी उपहासाकडे दुर्लक्ष करून व्रतस्थपणे समाजसेवा करावी असे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांनी केले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुहातर्फे मांगीलालजी नेत्रपेढी कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, प्रकल्प प्रमुख सचिन चोरडीया, सहप्रमुख डॉ.धर्मेंद्र पाटील, नेत्रपेढी व चाईल्ड लाईन समन्वयक भानुदास येवलेकर, नेत्रपेढी व्यवस्थापिका सौ.राजश्री डोल्हारे उपस्थित होते. यावेळी विजय लुल्हे यांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिशी मार्गदर्शक तथा प्रकाशक युवराज माळी,सक्रिय सभासद श्रीमती उषा सोनार,अंनिस कार्यकर्ते महेश शिंपी,चित्रकार सुनील दाभाडे , पंकज नाले यांनी अमूल्य सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन ह.भ.प.मनोहर खोंडे यांनी केले.आभार प्रदर्शन सुनिल दाभाडे यांनी केले .